10 वी, 12 वी उच्‍चशिक्षणासाठी देश, परदेशातील शिक्षणाच्या संधी, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध प्रकारचे दाखले विषयक मोफत कार्यशाळा

10 वी, 12 वी उच्‍चशिक्षणासाठी देश, परदेशातील शिक्षणाच्या संधी, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध प्रकारचे दाखले विषयक मोफत कार्यशाळा

उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण संधी व विविध दाखल्यांवरील मोफत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. १७ : शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी देश-विदेशातील शिक्षणाच्या संधी, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच विविध आवश्यक दाखल्यांविषयी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सरहद कॉलेज हॉल, कात्रज डेअरी जवळ, धनकवडी येथे करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना देश व परदेशातील शिक्षणाच्या विविध संधी, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना तसेच करिअरच्या नव्या वाटांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मा. प्रकाश बच्छाव, सहसंचालक उच्च शिक्षण यांनी उच्च शिक्षणातील विविध पर्याय व शासकीय योजनांविषयी माहिती दिली. मा. दत्तात्रय जाधव, Joint Director Technical Education यांनी तांत्रिक शिक्षणातील संधी, प्रवेश प्रक्रिया व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले.

तसेच श्री. प्रविण बांबळे व श्री. संतोष जाधव (सारथी) यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध शिष्यवृत्ती योजना, आर्थिक सहाय्य व शासनाच्या उपक्रमांविषयी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमात सचिन वडघुले यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे विविध दाखले, त्यांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.

सदर कार्यशाळा शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे राबविण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तसेच विश्वस्त विक्रमसिंह लावंड, सागर शेडगे व रामचंद्र चोरगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.