शिवसहयाद्री चॅरिटेबल फाउंडेशन शिष्‍यवृत्‍ती निवेदन २०२६

शिष्यवृत्तीसाठी निवेदन

            पुणे येथे उच्च शिक्षण घेणार्‍या L.L.M. /M.E. /B.A.M.S./ Arch. / B.Sc Agriculture / Engineering /Sports / Pharmacy / M.B.A. / M.B.B.S., Robotics engineering, AI/ML, Biomedical Engineering, AIDS विशेष प्रकारचे कोर्सेस इतर तत्सम पदव्युतर पदवी अभ्यासक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू ग्रामीण व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांला १० वी, १२ वी मध्ये ८०% च्या पुढे तसेच पदवी परीक्षेत ७५% गुण प्राप्त असावेत.

            इच्छुक विद्यार्थ्यानी खाली नमूद लिंकवरील फॉर्म भरावा किंवा संस्थेशी संपर्क साधून E-mail Id दिल्यास फॉर्म पाठविण्यात येईल.

Link: https://forms.gle/uKDSJskEGTAesLZn7

Email Id: [email protected]

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२६, वेळ – सायं. ६ वाजेपर्यंत.

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन

पत्ता : ऑफिस नं. ३०६ मंगलमूर्ति कॉम्प्लेक्स कंडोमिनियम, टिळक रोड, हिराबागेजवळ,

पुणे – ४११००२.

टेलिफोन : ७३२२९००९००  ,  ०२० – २४४८७८७८

वेळ : ११.३० ते ६ (रविवार बंद )

टीप

  • जे विद्यार्थी प्रथम वर्षापासून शिक्षण घेत आहे. त्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. दुसर्‍या, तिसर्‍या किंवा शेवटच्या वर्षी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये.

  • येणार्‍या अर्जाची संख्या व विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, ग्रामीण परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, शैक्षणिक पार्श्वभूमी विचारात घेऊन विद्यार्थी निवडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज केला म्हणजेच शिष्यवृत्ती मिळाली, याची संस्था खात्री देणार नाही.

  • ज्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी राज्य शासन भरते त्यांनी अर्ज करु नये.

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य.