EWS CERTIFICATE
EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्राच्या व राज्याच्या शासकीय सेवेत तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये १०% EWS आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
लिंक – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
संसदेने राज्य घटनेत घटना दुरुस्ती करून निर्माण केलेल्या अनुच्छेद १५ (६) व १६(६) प्रमाणे आर्थिक दुर्बल घटकासाठी म्हणजेच EWS प्रवर्ग आरक्षण . ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये च्या आत असेल असा व्यक्ति EWS प्रमाणपत्र प्राप्त करू शकतो. सदर प्रमाणपत्र हे पुढील १ वर्षाच्या कालावधीसाठी वापर करू शकतो.
(ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले असेल त्यांना EWS प्रमाणपत्र मिळत नाही.)
| Central EWS | State EWS |
| १) ओळखीचा पुरावा (किमान १ ): आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना,..
२) रहिवासी पुरावे – लाईटबिल, टॅक्स पावती ३) अर्जदाराचे १ फोटो, लाभार्थीचा १ फोटो ४) अर्जदाराची जात / पोटजात ५) अर्जदाराची शेती असल्यास त्याचे ठिकाण, सर्व्हे क्रमांक व पत्ता ६)अर्जदार महाराष्ट्राबाहेरून राज्यात आला असल्यास त्याचा राज्यातील वास्तव्याचा कालावधी (वर्ष व दिनांकासह) १९६७ पुर्वीचा ७) तहसीलदार यांचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा उत्पन्नाचा पुरावा म्हणून (ITR, Form No.16) ८) शिधापत्रिका ९) रहिवासी पुरावा १०) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला. ११) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला (जात नमुद असावे). १२) १९६७ च्या पुर्वी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला (आजोबा/पणजोबा/आत्या) किंवा महसुली पुरावा,१९६७ पुर्वीचा मराठा (OPEN) जात नमुद पुरावा १३) प्रतिज्ञापत्र (विहीत नमुन्यात) १४) स्वघोषणापत्र, फोटो, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र १५) वार्षिक उत्पन्न आर्थिक वर्षासाठी 8 लाख (फक्त आठ लाख रुपये) पेक्षा कमी असावे. १६) अर्जदाराच्या कुटुंबाकडे खालीलपैकी कोणतीही मालमत्ता नाही किंवा त्यांच्याकडे नाही. १) शेतजमीन 5 एकर पेक्षा जास्त नसावी. (एकत्र कुटुंबात शेतजमिनीचे वाटप झालेले नसल्यास ७/१२वर ५ एकर पेक्षा जमीन जास्त असल्यास वाटपाने अर्जदाराच्या वडिलांच्या हिश्याला येणारे मानीव क्षेत्र गृहीत धरून अर्जात तसा उल्लेख करावा.) २) निवासी सदनिका 1000 चौ. फूट .आणि त्याहून अधिक नसावी. ३) 100 चौरस यार्ड पेक्षा अधिक निवासी भूखंड नसावा. (900 चौ. फूट) ४) अधिसूचित नगरपालिकांव्यतिरिक्त इतर भागात 200 चौरस यार्डचा किंवा त्यापेक्षा अधिक निवासी भूखंड नसावा. (1800 चौ. फूट) १७) सदर प्रमाणपत्र हे ३१ मार्च पर्यंत वैध असते. हे प्रमाणपत्र दर आर्थिक वर्षात उत्पन्नाच्या आधारावर नवीन काढावे लागते. |
१)ओळखीचा पुरावा (किमान १ ): आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना .
२) रहिवासी पुरावे – लाईटबिल, टॅक्स पावती ३) अर्जदाराचे १ फोटो, लाभार्थीचा १ फोटो ४) अर्जदाराची जात / पोटजात ५) अर्जदाराची शेती असल्यास त्याचे ठिकाण, सर्व्हे क्रमांक व पत्ता ६) अर्जदार महाराष्ट्राबाहेरून राज्यात आला असल्यास त्याचा राज्यातील वास्तव्याचा कालावधी (वर्ष व दिनांकासह) १९६७ पुर्वीचा ७) तहसीलदार यांचा १ वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा उत्पन्नाचा पुरावा म्हणून (ITR, Form No.16) ८) शिधापत्रिका ९) रहिवासी पुरावा १०) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला. ११) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला (जात नमुद असावे). १२) १९६७ च्या पुर्वी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला (आजोबा/पणजोबा/आत्या) किंवा महसुली पुरावा,१९६७ पुर्वीचा मराठा (OPEN) जात नमुद पुरावा १३) प्रतिज्ञापत्र (विहीत नमुन्यात) १४) स्वघोषणापत्र, फोटो, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र १५) वार्षिक उत्पन्न आर्थिक वर्षासाठी 8 लाख (फक्त आठ लाख रुपये) पेक्षा कमी असावे. १६) यासाठी शेतजमीन व घराची किंवा जागेची कोणतीही अट नाही. १७) सदर प्रमाणपत्र हे ३१ मार्च पर्यंत वैध असते. हे प्रमाणपत्र दर आर्थिक वर्षात उत्पन्नाच्या आधारावर नवीन काढावे लागते.
|
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज करावा.