आवाहन
देणगी आवाहन
विषय :- शिष्यवृत्तीसाठी देणगी/शिवसह्याद्री युथ डेव्हलपमेंट सेंटरसाठी देणगी मिळणेबाबत विनंती.
महोदय,
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन मार्फत आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ७ वर्षापासून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती व व्यावसायिक कंपन्या यांनी शिष्यवृत्ती पुरस्कृत केलेल्या आहेत. संस्थेकडे आतापर्यंत १ कोटी ७० लाख रुपयांचा शिष्यवृत्ती निधी जमा झालेला आहे. हा कायम निधी 5 कोटीपर्यंत नेण्याचा संकल्प आहे.
आपल्या मार्फत शिष्यवृत्तीसाठी एकरकमी देणगी देणेबाबत विनंती आहे. आपण दिलेली देणगी बँकेत मुदत ठेवीत ठेऊन दरवर्षी त्याच्या ३१ मार्च अखेर येणाऱ्या व्याजाची रक्कम उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व गौरव प्रमाणपत्र स्वरुपात विद्यार्थ्यांस देण्यात येईल.
संस्थेच्या वतीने नविन विस्तारित कार्यालयात शिवसह्याद्री युथ डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येत आहे. ग्रामीण युवक-युवतींना सद्यस्थितीत उपयुक्त मार्गदर्शन, प्रशिक्षण, युवक सर्वांगिण नेतृत्व विकास केंद्र आणि सुसज्ज डाटाबेस ग्रंथालय व विविध योजनांच्या मार्गदर्शनासाठी मदत कक्ष निर्माण करण्यात येत आहे.
संस्थेने गेल्या ७ वर्षात सातत्यपूर्ण केलेल्या कार्याच्या विस्तारित प्रकल्पास आपले सहकार्य अपेक्षित आहे. देणगीवर Income Tax 80G अंतर्गत सवलत आहे. आपणाकडून सहकार्य मिळावे ही विनंती.
A/c. Name : Shivsahyadri Charitable Foundation
Bank & Branch Name : Janata Sahakari Bank Ltd., Pune
Shukrawar Peth, Bajirao Road, Pune – 02
Saving Account No. : 001220100090867
IFSC Code : JSBP0000098
MICR Code : 411074002