अभिप्राय

मा. शरदरावजी पवार साहेब

छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सर्वाना अभिमान आहे पण जग बदलत असताना जुन्या गोष्टींचाच विचार करीत बसलो तर या प्रेरणेतून आपल्या गरजेची पूर्तता कधीच होऊ शकणार नाही. आजच्या परिस्थितीत त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन ज्ञान विज्ञानाची कास धरत नवी कर्तृत्ववान पिढी घडवायला हवी.आपण विविध क्षेत्रात कर्तृत्व दाखवणारी पिढी तयार करतोय. त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी पाहिजे. त्यासाठी ज्ञानाशी तडजोड करुन चालणार नाही. आपल्याला आत्मविश्वासाने उभी राहणारी तरुणांची पिढी निर्माण करायची आहे.

डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष हमाल पंचायत

हमाल पंचायत ही एक संस्था नसून ती चळवळ आहे. असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा मंजूर झाला. पण ओळखपत्राखेरीज त्यांना काही मिळाले नाही. गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचे मोठे आव्हान उभे आहे. त्यासाठी सरकारसह सर्व घटकांनी हातभार लावला पाहिजे.

राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष शिवसह्याद्री

महाग झालेल्या उच्च शिक्षणासाठी धनवंतांनी गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या मदतीचा हात देऊन सहकार्य केले पाहिजे, राज्याच्या ग्रामीण भागात शिष्यवृत्ती दाते व विद्यार्थी यांची मोठी साखळी निर्माण होणे आवश्यक आहे. ह्यासाठी धनवंतांनी पुढाकार घ्यावा, शिवसह्याद्रीने यासाठी ५ कोटी रूपये निधी संकलनाचे उद्दीष्ठ ठेवले आहे.

मा. प्रशांत जगताप, महापौर पुणे

शिवसहयाद्री फाउंडेशनच्या मागणीनुसार आणि मा. शरद पवार साहेबांच्या सुचनेनुसार पुणे महापालिकेच्या वतीने बावधन येथे ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मुला-मुलींसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने वसतिगृह उभारले जाईल.