उद्दिष्टये
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशन उद्दिष्ट्ये
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘गौरव शिष्यवृत्ती’ देणे.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कृषी, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा इ. क्षेत्रात शिवसह्याद्रीच्या उद्दिष्टांना पूरक कार्य करणार्या संस्था किंवा व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करणे.
युवक, युवतींसाठी उच्च, व्यावसायिक /तांत्रिक शिक्षणासाठी उपलब्ध संधीची माहिती देणारी विविध प्रकारची मार्गदर्शनपर शिबिरे/कार्यशाळा आयोजित करणे. विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित करणे.
सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत कार्य करणार्या संस्थांना सहकार्य देऊन त्यांच्या कार्याला चालना देणे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृह बांधणे. आर्थिक दुर्बल विद्यार्थी व महिला यांचेसाठी युथ डेव्हलपमेंट सेंटर सुरु करणे.