नवउद्योजकांसाठी यशस्‍वी कर्जप्रकरणांची गुरुकिल्‍ली

नवउद्योजकांसाठी कर्जप्रकरणांवरील मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पुणे : नवउद्योजकांना शासकीय कर्ज योजनांची सखोल माहिती व व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शिवसह्याद्री युथ डेव्हलपमेंट सेंटरतर्फे आयोजित “यशस्वी कर्जप्रकरणांची गुरुकिल्ली” ही मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन, सारसबाग, पुणे येथे झालेल्या या कार्यशाळेला मोठ्या संख्येने नवउद्योजक, युवक-युवती व व्यावसायिकांनी उपस्थिती लावली.कार्यशाळेत PMEGP, CMEGP, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी महामंडळाच्या कर्ज योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कर्ज प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे, सिबिल (CIBIL) स्कोअरचे महत्त्व, तसेच कर्ज घेण्यापूर्वी व घेतल्यानंतरची आर्थिक साक्षरता याविषयी तज्ज्ञांनी उपस्थितांना माहिती दिली.याशिवाय, प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे नवउद्योजकांना कर्ज मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत झाली. सहभागींकडून विविध शंका विचारण्यात आल्या असून त्यांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.या कार्यशाळेमुळे नवउद्योजकांना योग्य दिशा मिळून स्वावलंबनाच्या वाटचालीला बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.