संवाद कौशल्य व व्यक्तीमत्व विकास
चर्चा , परिसंवाद किंवा मुलाखतीत सहभागी होताना
१) चर्चेमध्ये सर्व व्यक्तींना सहभागी करण्याचा प्रयत्न करावा . शक्यतो समान संधी द्यावी.
२) चर्चेचा चेंडू सतत एका व्यक्तीकडे न ठेवता तो फुटबॉल किंवा हॉकीसारखा इतरांकडे PASS ON करावा .
३) गटचर्चेत ( Group discussion) सहभागी होताना बोलणाऱ्या व्यक्तीने मोजक्या शब्दात योग्य उदाहरणे देऊन आपले मत थोडक्यात मांडावे .
४) समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे . तसे चेहऱ्यावर दर्शवावे . त्यांचे मत पूर्ण झाल्याशिवाय आपले बोलणे सुरु करण्याची घाई करू नये.
५) समोरच्या व्यक्तीच्या मताशी सहमत नसल्यास लगेचच आपल्या देहबोलीतून नकारात्मक प्रतिसाद देऊ नये . त्यावर आपले मत मांडताना अथवा प्रतिवाद करताना “होय … पण ( Yes …. but ) ” या तंत्राचा वापर करावा
६) चर्चा करताना कोण बरोबर किंवा चुकीचे आहे हे ठरविण्यापेक्षा नेमके काय चुकीचे किंवा बरोबर आहे यावर विचारमंथन व्हावे .
७) वादविवादात जिंकताना समोरची व्यक्ती दुखावली गेल्यास होऊ शकणारे नुकसान मोठे असू शकते म्हणून चर्चा करताना वादविवाद किंवा विसंवाद टाळून सुसंवादावर भर द्यावा.
ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत त्या व्यक्तीला आवडणा-या विषयावर बोलतं करावयाचे आहे याचे भान मुलाखतकाराने ठेवावयास हवे. त्या व्यक्तीचा interest ज्या गोष्टीत असेल त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जावा.
ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची त्या व्यक्तीबद्दल मुलाखतीच्या आधी काही माहीती मिळवावी जिचा उपयोग करून मुलाखतीला सुसंगत असे प्रश्न विचारण्यास मदत होईल. लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तबगारीबद्दल , यशाबद्दल बोलायला आवडते. ती व्यक्ती बोलता बोलता काही संदर्भ देत असते . त्यावरूनही काही प्रश्न विचारता येतात यासाठी त्या व्यक्तीचे बोलणे लक्षपुर्वक ऐका. व्यावसायिक मुलाखत असेल तर वैयक्तीक प्रश्न विचारू नये. वैयक्तीक मुलाखत किंवा मिटींग मधे व्यावसायिक फार बोलू नये.
विनोदबुध्दी वापरावी पण ती सवंग होऊ नये याची काळजी घ्यावी शिवाय समोरच्या व्यक्तीचे अज्ञान उघडे पडू नये याची काळजी घेऊन प्रश्न विचारले जावेत. आपल्याला समोरच्याला जिंकायचं आहे की वादात जिंकायचं आहे हे ठरविणे महत्वाचं.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असणाऱ्या….सॉफ्ट स्किल्स
नोकरी मिळविण्यासाठी फक्त मार्क्स किया डिग्री उपयोगी नाही तर, याबरोबरच तुमच्या अंगी काही स्किल्स म्हणजेच कौशल्य असणे तितकेच महत्वाचे आहे. मग या स्किल्स उत्तम नोकरी किंवा यशस्वी व्यवसायासाठी उपयोगी पडतात, यामध्ये प्रामुख्याने कम्युनिकेशन (संवाद), लीडरशीप (नेतृत्व), निगोशिएशन (वाटापाठ) प्रमुख स्किल्स आहेत. या व्यक्तीमत्वामध्ये दडलेली विशेषतः तसेच इतर गुणवैशिष्टये जी आपल्याला जीवनात इतरांशी संवाद साधताना तसेच आपल्या निवडलेल्या क्षेत्रात तसेच नोकरी किंवा व्यवसायामध्ये य होण्यास आपणास मदत करत असतात.
- कम्युनिकेशन (संवाद): स्किल ही एक संवाद साधण्याची कला तसेच कौशल्य आहे. मग हे कम्युनिकेशन फोन वर असो किंवा व्यक्तिशः असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो. उत्तम संवाद कौशल्य सा व्यक्ती दैनंदिन जीवणात किंवा नोकरी व्यवसायात देखील नक्कीच यशस्वी होतात.
- भाषा ज्ञान मराठी भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याच बरोबर इंग्रजी भाषेचे आत्मसात करणे तितकेच आवशयक आहे. कारण कार्यालयीन हा व्यवहार इंग्रजी भाषेमध्येच चाल त्याकरिता इंग्रजी वाचता बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे.
- कम्प्यूटर स्किल्स : ऑफिस कामकाज करताना प्रत्येकाला किमान ई-मेल वाचणे ते समजून त्याला उत्तर देणे, दैनंदिन व्यवहाराचे लेखाजोका ठेवण्याकरिता एक्सेलचे ज्ञान, वर्ड लेटर टायपिंग करणे, एखाद्या ग्राहकाकरिता पावर पॉइंटमध्ये प्रेझेन्टेशन तयार करणे किमान एवढे तरी कम्प्यूटर स्किल्स कौशल्य असणे
गरजेचे आहे.
- लीडरशीप ही एक नेतृत्व करण्याची कला तसेच कौशल्य आहे. जी कंपनीत किंवा एखाद्या संस्थेमध्ये लीडर म्हणून काम करत असताना आपणास उपयोगी पडत असते. जेणेकरून इतरांचे नेतृत्वकरून स सोबत घेऊन काम पार पाडेल.
- निगोशिएशन हे एक वाटाघाटी, मोलभाव, भावताव करण्याची कला तसेच कौशल्य आहे. जी गृहिणी पासून मोठ्यात मोठ्या उद्योग व्यवसायात ग्राहकांशी व्यवहार करत असताना तसेच दैनंदिन जीवनात ख विक्री करताना आपणास उपयोगी पडत असते.
- टीम वर्क ही एक सगळयांसोबत मिळून मिसळुन संघभावनेने काम करण्याची कला तसेच कौशल्य आहे. कंपनीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी Team मध्ये सामील होणे आणि इतरांसोबत भागीदारीत मिळुन मिसळुन
काम करणे याचे महत्व आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. टीम मेंबर्सची प्रशंसा करणे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करुन घेणे ही टीम वर्कची उदाहरणे आहेत.
प्रोब्लेम सॉल्व्हिंग : समस्या सोडविणे ही एक कला कौशल्य आहे, समस्या सोडवण्याची त्यातुन बाहेर पडण्यासाठी उपाय शोधण्याची कला तसेच कौशल्य आहे. जी प्रत्येक नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायात, दैनंदिन जीवनात येत असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपणास उपयोगी पडत असते.
- पॉझीटीव्ह अॅटिट्यूड : माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटे, अडचणी, दुख: समोर येतात, परंतु कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार सोडता कामा नये, जेणेकरून आयुष्य सुखकर होईल. याचबरोबर इतरही अनेक स्किल्स किंवा कौशल्य आहेत जे व्यक्तीच्या सुप्त गुण आहेत ते ओळखून विद्यार्थ्यांनी नोकरीची किंवा व्यवसायाची वाट पादक्रांत करावी व यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचावे हीच सदिच्छा!