(Age. Nationality & Domicile Certificate)
शैक्षणिक , नोकरी प्रयोजनासाठी आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे :-
1) विहीत नमुन्यातील अर्ज
2) अर्जदाराचे फोटो
3) स्वघोषणापत्र
4) ओळखीचा पुरावा – पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालक अनुज्ञप्ती (Driving License)
5) वयाचा पुरावा (स्वतः चा ) :- जन्म दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, सेवा पुस्तिका (शासकीय निमशासकीय कर्मचारी). (नियम – वयाच्या पुराव्यामध्ये पुर्ण जन्मतारीख आणि जन्मस्थळ असणे आवश्यक आहे.)
6) वडिलांचा पुरावा (किमान १) :- जन्म दाखला. शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, सेवा पुस्तिका (शासकीय / निम- शासकीय कर्मचारी), डोमिसाईल प्रमाणपत्र (नियम – वडिलांच्या पुराव्यामध्ये पुर्ण जन्म तारीख आणि जन्म स्थळ असणे आवश्यक आहे.
7) पत्याचा पुरावा (किमान १) :- वीज देयक, भाडे पावती, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती
(नियम- अ) पत्याच्या पुराच्या मधील कागदपत्रे मागील १० वर्षाची तरी पाहिजे. ब) पत्याच्या पुराव्या मधील जे भाड्यानी राहत असतील त्यांनी घरमालकाचे वरील रहिवासी पुराव्यातील कागदपत्र व घरमालकाचे संमतीपत्र द्यावे.
8) इतर दस्तावेज :- अ) शिधापत्रिका ब) स्थानिक रहिवाशी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला रहिवाशी दाखला
9) इतर राज्य :- वडील जर इतर राज्यातून स्थलांतरीत झालेले असतील तर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र द्यावे आणि १५ वर्षाची कर पावती व सुची क्र. २ (Index 2) सादर करावे.
10) विवाहित स्त्री करिता : अ) विवाह नोंदणी दाखला, राजपत्र (किमान १)
ब) पतीकडील कागदपत्रे (किमान १) :- पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज करावा.