नॉन क्रिमिलेअर दाखला ( Non Creamy Layer)

शैक्षणिक , नोकरी प्रयोजनासाठी नॉन क्रिमिलेअर दाखला  

आवश्यक कागदपत्रे :

हा दाखला कुटुंबाचे उत्‍पन्‍न ८ लाख किंवा त्‍यापेक्षा कमी असेल तर मिळतो.

  1. कुटुंबाचे उत्‍पन्‍न म्‍हणजे – स्‍वतः, पत्‍नी/पती, मुले, मुली, आई, वडील, बहीण, भाऊ, (रेशनकार्ड मधील कुटुंबातील सर्व सदस्‍य) यांचे उत्‍पन्‍न
  2. केंद्र व राज्‍य सरकारच्‍या सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांचे वेतन या प्रमाणपत्रासाठी (८ लाखामध्‍ये) ग्राह्य धरले जात नाही.
  3. शेतीतील उत्‍पन्‍न या प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरले जात नाही.

१) विहित नमुन्यातील अर्ज

२) अर्जदाराचे २ फोटो.

३) स्वघोषणा पत्र.

४) 3 वर्षाचा तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न ८ लाखाच्या आत असावे)

५) ओळखीचा पुरावा (किमान १) – आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालक अनुज्ञप्ती ड्रायव्हिंग लायसन्स

६) स्वतःचा पुरावा – (अ) शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेत शिकत असल्यास शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र ज्यावर जातीचा उल्लेख असेल. (ब) स्वतःचा जातीचा दाखला. ६) वडिलांचा पुरावा – अ) वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, ज्यावर जातीचा उल्लेख असेल. ब) वडिलांचा जातीचा दाखला. स्वतः चा किंवा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा पुरावा, जात पुरावा नमुद पुरावा.

७) इ.मा.व. दि. १३/१०/१९६७  किंवा त्या पूर्वी येथे जन्म झालेल्या, अर्जदार आणि अर्जदाराचे वडील, भाऊ, बहीण, आजोबा, चुलते, आत्या किंवा इतर रक्त नातेसंबंधातील व्यक्तीची जात नमूद असलेला एक पुरावा सादर करावा. शाळा सोडल्याचा दाखला. महसूल अभिलेखातील जन्म-मृत्यु नोंदीचा उतारा.  शासकीय निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा. समाजकल्याण खात्याकडील जातपडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.

८) वडिलांचा जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यामुळे इतर रक्त नातेसंबंधितांचे पुरावे दिल्यास, नाते स्पष्ट होण्यासाठी वंशावळ असलेले प्रतिज्ञापत्र व नाते स्पष्ट होणारे कागदोपत्री पुरावे सादर करावे.

९) अर्जदार परजिल्ह्यातून स्थलांतरित झाला असल्यास, ज्याचा मूळ राज्यातील / जिल्हयातील सक्षम प्राधिका-यांनी अर्जदारांच्या वडिलांना दिलेला जातीचा दाखला.

१०) रहिवास पुरावा म्हणून शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत व लाईट बिल सादर करावे.

११) विवाहित स्त्रीयांसाठी प्रमाणपत्र हवे असल्‍यास विवाहापूर्वी जात सिद्ध करणारा किंवा रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा पुरावा म्हणून विवाहनोंदणी दाखला किंवा राजपत्रात प्रसिद्ध झालेला नाव बदलाबाबतचा पुरावा सादर करावा.

१९६७ सालचे रहिवासाबाबत महसुली पुरावा सादर करावा. इतर दस्‍तऐवज.

(टीप: जर अधिका-यांनी जातीच्या पुराव्‍याबाबत अन्य पुरावे मागितले, तर ते अर्जदारास सादर करावे लागतील.सदर प्रमाणपत्र हे पुढील 3 वर्षाच्या कालावधीसाठी वापर करू शकतो )