उत्पन्नाचा दाखला
(शैक्षणिक , नोकरी व वैद्यकीय प्रयोजनासाठी)
- स्वघोषणापत्र,
- अर्जदाराचा फोटो
- रहिवासी पुरावा – वीज बील / मालमत्ता कराची पावती / तलाठ्याने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामपंचायत / सरपंचाने जारी केलेला रहिवास दाखला, पोलीस पाटलाने जारी केलेला रहिवास दाखला,
- शिधापत्रिका प्रमाणित प्रत (रेशनकार्ड)
- तलाठी यांचा चौकशी अहवाल चालु वर्षाचे आयटीआर किंवा फॉर्म १६ ए व बी ( नॉन क्रिमीलेअर साठी हवा असल्यास मागील ३ वर्षाचे आवश्यक आहे) आयकर भरण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म किंवा ज्या ठिकाणी काम करतो, तेथील मालकाने दिलेले गत आर्थिक वर्षातील एकूण वेतन प्रमाणपत्र / बॅंकेच्या पासबुकाची प्रत / चालु सातबाराचा उतारा / तलाठयाने जारी केलेले आयकर प्रमाणपत्र/ तलाठी / सर्कल ऑफीसरने जारी केलेला पडताळणी अहवाल / वैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र
- आधारकार्ड , छायाचित्र ओळखपत्र / पॅनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / वाहन परवाना / पारपत्र / फोटो असलेले बँक पासबुक / झोपडपट्टी फोटोपास / ज्येष्ठ नागरिक दाखला / नोकरीचे ओळखपत्र (पैकी कोणतेही एक)
- शिक्षणासाठी असेल तर विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पुरावे.
- मंडलाधिकारी चौकशी अहवाल, मंडल अधिकारी अहवाल
सदर प्रमाणपत्र हे पुढील १ वर्षाच्या कालावधीसाठी वापर करू शकतो
या दाखल्यासाठी पूर्ण कुटुंबाचे उत्पन्न धरले जाते. म्हणजे – स्वतः, पत्नी/पती, मुले, मुली, आई, वडील, बहीण, भाऊ, (रेशनकार्ड मधील कुटुंबातील सर्व सदस्य) यांचे उत्पन्न
हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज करावा.
